श्री नगरीनिरंजन,

आपल्या आधीच्या प्रतिसादापेक्षा हा प्रतिसाद खचितच चांगला आहे. विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. खरच, कुणी काय घालावे यावर बंधने नसावीत हे मला मान्य आहे.

पण - ज्या समाजात व्यक्ती राहते त्या समाजाचे 'निकष' काय आहेत यांचे ज्ञान ठेवून तसे राहणे हे योग्य नाही काय?

म्हणजे जाणूनबुजुन काहीतरी वेगळे/प्रगत/आधुनिक करतो आहे हे दाखवण्याची काही गरज आहे का?

महत्त्वाचा प्रश्न - समाजातील सगळ्या लोकांची मानसिकता एकच आहे का? समजा मी किंवा तुम्ही किंवा आणखीन कुणी एखाद्या मुलीकडे तसे नाही पाहिले तरी इतर कुणी तसे पाहणारच नाही याची शाश्वती आहे का?

आणखीन एक - आपला दृष्टिकोन मला पटत नाही असे मी नम्रपणे म्हणू इच्छितो. मला तरी स्त्रियांना ( घरातील ) असे कुणी पाहिलेले आवडू शकत नाही. पण ही व्यक्तीगत बाब आहे.

अवांतर - एकंदर अर्ग्युमेंटच्या फ्लो मध्ये मी आपल्याला काही वैयक्तिक स्वरुपाचे बोलून गेलो असे वाटत असल्यास कृपया सोडून द्यावेत. पण मी अजूनही ठामपणे म्हणतो की आपण प्रदर्शित केलेले विचार मला पटले नाहीत.

धन्यवाद!