फारच मनावर घेतल गेलय की काय? सहज मजा म्हणून सगळा कंपू वीस वर्षानतर कसा असेल याचं चित्र रंगवावं असं अपेक्षित होतं. मनोगतींच्या कल्पना काय काय भन्नाटच असतील असं वाटलं होतं, शिवाय सशीण म्हणतात ते पटलं.. चिंटू ला ही जरा मोठं होऊ द्या .. निदान काही क्षणांसाठी तरी.. पौगंडावस्थेचा आनंद परत मिळवून पहा. जरासं चिंटू ला ही मिसरूड फुटू दे की ...त्या निमित्ताने आपापल्या त्या कोवळ्या वयात परत परत जाता येईल. निसरड्या हळव्या फुलपाखरी वाटेवर थोडं मागं वळून पहता येईल..
अदिती म्हणाली ती सुहृद गोडबोले ची एकांकिका पहायला खूप आवडली असती.
असो..अजून काही भन्नाट कल्पनांच्या प्रतीक्षेत ...