मिलिंद जी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपले मत काहीसे खरे आहे.अशा गझलेत 'छोटा बहर - तोही अर्ध्याहून अधिक रदीफने व्यापलेला असल्यामुळे' वरचा मिसरा सशक्त असावा लागतो व तिथे नेमकी शब्द योजना करतांना कसरत होते व 'प्रसंगी अभिव्यक्तीचा श्वास गुदमरू शकतो'. मलाही पूर्वी रचना करतांना असेच जाणवले होते.शेराचा व पर्यायाने गझलेचा विषय जितका गहन व व्यापक असेल तितके जास्त शब्द- बहर मोठा होतो. पण निदान या गझलेत तरी चुकांचा साधा कबुलीजबाब आहे. त्यामुळे वरच्या मिसऱ्यात नेमकी वस्तुस्थिती मांडणे येवढेच उरले व बाकीचे काम काफिया व विशेषतः रदीफ(चुकले असावे)करून गेले आहेत असे वाटते. या गझलेचा 'जीव' लहान असल्यामुळेही कदाचित ते छोट्या बहरात शक्य झाले असावे.
आपला अनुभव या विषयातला मोठा आहे. आणखी चर्चा व्हावी.
जयन्ता५२