काही काळापूर्वी युद्धाने होरपळलेल्या अफगाणिस्तानातल्या परिस्थितीचं विदारक वर्णन करणाऱ्या तीन कादंबऱ्या आलया होत्या - द ब्रेड विनर, परवाना आणि शौजिया. त्यांची लेखिका डेबोरा एलिस एक परदेशी महिला पत्रकारच आहे. या कादंबऱ्यांना आपल्या देशात डोक्यावर घेतलं गेलं. त्यांची मराठीत भाषांतरेही झाली आहेत. (मी तीच वाचली होती. ) अफगाणिस्तानातला सर्वसामान्य माणूस कश्या परिस्थितीत राहतो आहे हे ते वाचल्यावरच समजतं.
जर या कादंबऱ्या आवडतात तर मग आपल्या देशातली गरीबी दाखवणारा हा चित्रपट का नको? काही मूठभर लोकांची श्रीमंती, पैश्यांच्या जोरावर चाललेला नंगानाच, एकता कपूरच्या मालिकांमधले ओंगळवाणे प्रसंग परदेशात अनेकांनी अनेकदा पाहिले. खरा आरडाओरडा तेव्हा व्हायला हवा होता.
हे आहे हे असं आहे, माझा देश हा असा आहे, मुंबई ही अशी आहे ही सत्यता स्वीकारावी हे उत्तम.