धन्यवाद, जयंतराव.
माझा रोख तुमच्या ह्या गझलकडे नव्हता. मी माझ्या प्रतिसादात म्हटले आहेच, "छोटा बहर - तोही अर्ध्याहून अधिक रदीफने व्यापलेला - तुम्ही उत्तम निभावलेला आहे ह्यात शंका नाही". ह्या गझलेच्या निमित्ताने ह्या विषयावर चर्चा व्हावी असे मात्र वाटले.

मला वाटते की कवीला जे सांगायचे असेल ते प्रभावीपणे, अर्थांच्या साऱ्या पदरांसह, व रचनेला विरूप न करता जितक्या कमी शब्दात मांडता येईल तितक्या शब्दात त्याने मांडावे. शब्दांचा पसारा वाढवू नये. पण हे जितके महत्त्वाचे तितकेच इतर निकषही. रचनेच्या दर्जाचा बहराच्या लांबीशी संबंध जोडू नये. छोट्या बहरात उत्तम गझला असतात तशाच ट-ला-ट छापही. तिच कथा मोठ्या बहराची. पण बरेच काही सांगायचे असल्यास कधी कधी छोट्या बहराच्या शब्दमर्यादा आड येतात ह्याबाबत मी तुमच्याशी सहमत आहे. ह्यालाच मी "अभिव्यक्तीचा श्वास गुदमरू शकतो" असे म्हटले होते.