"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे
ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे
गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!.... वा जयंतराव.. बढिया शेर.. चांदणे फारच उत्तम... (मतला व इतर शेर अधिक दमदार करता येतील का?)
मिलिंदजी,
लहान बहरातही अभिव्यक्ती कशी बहरेल, त्यासाठी काय शब्दयोजना करायची, कल्पना कश्या खुलवायच्या, आणि शब्द-मर्यादा असतानाही शेर कसा मनाचा ठाव घेणारा करायचा, हेच खरे गझलकारचे कसब आहे, कारण ते करणे अतिशय आव्हानात्मक आहे,- असे माझे मत
उदा- आयुष्य तेच आहे,
अन हाच पेच आहे.
ह्या गजलेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ह्यातील रदीफच इतके सुंदर निवडले आहे-ज्यात आशय व्यक्त करण्याच्या अनेक-अनेक शक्यता आहेत... नुसते 'चुकले असावे' ह्या शब्द-रचनेत सुद्धा एक दर्द जाणवतो.. त्याला चांगल्या कल्पनांची आणि समर्पक शब्दांची जोड दिली तर लहान बहर देखील अभिव्यक्ती-संपन्न होऊ शकते.. किंबहुना नामवंत गझलकारांनी लहान बहरात मुद्दाम काही लेखन करावे अशी मी विनंती करू इच्छितो.
जयंतराव, चालीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास- चित्तरंजनच्या मताशी मी सहमत आहे. ही गझल भीमरावांकडे पाठवून द्यावी असे आपल्याला सुचवितो
-मानस६