दिल्ली ६ ह्या चित्रपटातून जे भारतीयांचे चित्रण दाखवले आहे (मागास, अंधश्रद्धाळू, उथळ, धर्मांध, हिंसक, मूर्ख, कायद्याला धाब्यावर बसवणारे इ. इ. ) त्याने भारताची बदनामी जास्त होत नाही का? आणि चित्रपटातला एकमेव शहाणा, समंजस, सगळ्यांना समजून घेणारा माणूस म्हणजे अमेरिकन? असले अवास्तव मूर्ख चित्रपट  भारताची बदनामी जास्त करत नाहीत का? आणि हे जर चालू शकते तर स्लमडॉगवर काहीच आक्षेप नसावा. स्लमडॉग मध्ये नुसती अतीरंजीत गरीबी दाखवली आहे जी पैसा आला की जाईलही. पण दिल्ली ६ सारख्या चित्रपटात जे दाखवले आहे त्यावर मात्र कुणाचाच आक्षेप नाही.