इथे पाथेर पांचाली शी तुलना केली आहे त्याचे कारण सत्यजित रेंनी भारतातील गरीबीचे भांडवल केले हा पाथेरच्या टीकाकारांचा हा मुख्य मुद्दा आहे. इथे रे आणि बॉईल्स यांची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. दोघांची जातकुळी वेगळी आहे. दुसरी गोष्ट स्लमडॉग हा भारतीय चित्रपट नाही. त्यामुळे हे यश सर्वस्वी आपले नाहीच. तो ब्रिटीश चित्रपट आहे. आपले दिग्दर्शक अजूनही आग आणि डॉनचे रिमेक करण्यातच गुंतलेले आहेत.
तरीही आनंद या गोष्टीचा की या चित्रपटामुळे
१. रहमानला जगभर लोकप्रियता मिळाली.
२. रेसुल पाकुट्टीला - साउंड मिक्सिंग बद्दल ऑस्कर मिळाले. भारतीय तंत्रज्ञांची नवीन ओळख जगाला झाली.
३. यापुढे बॉलीवूड चित्रपटांचे मार्केट वाढणार यात शंका नाही. आणि असे झाले तर यात आपला फायदा आहे. (हे सांगावे लागते याचे आश्चर्य वाटते.)
रहमानची आधीची गाणीही चांगली होती. पण ती गाणी ज्या चित्रपटात होती त्या चित्रपटांना स्लमडॉगइतकी प्रसिद्धी मिळाली का? लगान अंतिम फेरीपर्यंत गेला पण तो फॉरेन फिल्म क्याटेगरीत. आणि लगानची गाणी भारतीय संगीतावर आधारलेली होती. साहजिकच ती सर्व लोकांना आवडणे शक्य नाही. पाश्चात्य शास्त्रीय संगीतामधील ऑपेरा हा प्रकार किती भारतीय लोकांना आवडतो? जय हो लोकप्रिय झाले कारण रहमानने त्यात बर्याच विविध प्रकारच्या संगीताचे मिश्रण केले.
स्लमडॉगचा अर्थ वर कोलबेर यांनी दिलाच आहे. अर्थात जर काढायच्याच असतील तर यात आणखी बर्याच चुका काढता येतील. आणखी एक आठवली. स्लमडॉगमुळे चुकीचा संदेश जातो. संदेश द्यायला स्लमडॉग डॉक्युमेंटरी आहे का? तो एक व्यावसायिक चित्रपट आहे. सरकार, सत्या, धूम या चित्रपटांमधून कोणता संदेश जातो? तरी ते लोकप्रिय होतात आणि तेव्हा आपण हा प्रश्न विचारत नाही. स्लमडॉगच्या अर्ध्या भागातली गरीबी दिसते पण शेवटी नायक करोडपती होतो हा आशावाद का दिसत नाही?
बॉटमलाईन : एका ब्रिटीश माणसाने मुंबईतील परिस्थितीवर, इथले कलाकार घेऊन एक
यशस्वी चित्रपट काढला. याच्या यशामुळे त्यातील भारतीय कलाकार लोकप्रिय झाले. एखादा
चित्रपट बॉलीवूड पद्धतीने काढून गाण्यांसकट टोपीकराच्या गळी उतरवणे ही साधी गोष्ट
नव्हे, ती बॉइल्सने करून दाखवली. यातच त्याची क्रिएटीव्हिटी दिसते.
हॅम्लेट