हा प्रतिसाद आवडला आणि पटला. पथेर पांचाली मी पाहिलेला नाही, अर्थात स्लमडॉगही अजून पाहिलेला नाही. पण एकूण व्यावसायिक हिंदी चित्रपटांचा दर्जा इतका सुमार असतो, त्यात अतार्किक गोष्टींचा भरणा इतक्या मोठ्या प्रमाणात असतो, कथाविषयाचा संबंध असो नसो कामुक, अंगविक्षेपांनी भरलेली आणि अंगप्रदर्शन करणारी गाणी असतात, वगैरे अनेक गोष्टींमधून अनेक चुकीचे संदेश जागतिक सोडा, पण देशपातळीवर अनेकांच्या मनांत जातात आणि त्यांचे वाईट परिणामही होतात. तेव्हा केवळ गरिबीचे प्रदर्शन म्हणून आक्षेप घेणे चुकीचे आहे.