विचार प्रवर्तक आणि वास्तववादी लिखाण.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अगदी दुर्गम, आंतर्भागात रोजगार हमी योजनांच्या वेगवेगळ्या कामांना भेटी देण्याचा योग आला होता. या सगळ्या कामांवर ८०% किंवा अधिक मजूर स्त्रियाच असतात. याचा अर्थ पुरुष दुसरीकडे किंवा कुठे शेतातली कामं करत असतात असा मुळीच नाही. पुरुष सगळे गावात, पारावर, चावडीवर गप्पा ठोकत बसलेले किंवा कुठेतरी दारू पिऊन पडलेले असतात. याचा अर्थ बाईनं सकाळी घरचं सगळं करून पोरांना घेऊन कामावर यायचं. तिथं दिवसभर मर मर मरायचं, पोरांकडेही बघायचं आणि पुन्हा संध्याकाळी घरी जाऊन घरचंही स्वयपाकपाणी आणि बाकी सगळं करायचं. आणि जणू या सगळ्याचं बक्षीस म्हणून रात्री अपरात्री नशेत आलेल्या नवऱ्याचा मारही खायचा.
विश्वास बसत नाही पण ही कथा त्या कामांवर येणाऱ्या जवळपास प्रत्येक स्त्रीची अशीच आणि संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी प्रत्येक गावातही अशीच असते. हे सारं फार वाईट आणि धक्कादायक आहे.