सर्व वाचकांना आणि प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

वरदा, भानस - आपण स्पष्ट शब्दात मांडलेल्या मतांबद्दल धन्यवाद. माझ्या पुढच्या लिखाणासाठी या मतांचा आणि सूचनांचा नक्कीच चांगला उपयोग होईल.  ही कथा लिहिताना, खरं तर कथेत तसा फारसा कथा-आशय काही नसल्यामुळे कथा वाचकांना कंटाळवाणी होईल की काय अशी भीती सतत वाटत होती. त्यामुळे कथा फार मोठी होऊ दिली नाही पण मला वाटतं तिच चूक झालेली दिसतीये.  दुसरं म्हणजे कथेच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे एखाद्या माणसानं या सगळ्या सिस्टीमच्या बाहेर पाऊल टाकायचं ठरवलं तर काय काय होऊ शकतं यावर वाचकाच्या विचारांना चालना देणं हा कथेचा मूळ उद्देश्य सुरुवातीपासून डोळ्यासमोर ठेवला होता.  आपण दिलेल्या परखड मतांमुळे हा उद्देश्य तितकासा सफल न झाल्याचं लक्षात येतंय.  अशी स्पष्ट मतं त्यामुळेच पुढील सुधारणांसाठी खूप महत्त्वाची असतात. 

आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार!