करायला हवे हे मान्य. जागोरे डॉट कॉमचा उपक्रम स्तुत्य आहे. तरुणाईला आकर्षित करेल अशी जाहिरातही खूप आवडली. याचा परिणाम मतदानाच्या संख्येत वाढ होण्यात झाला तर आनंदच आहे.
तुम्ही मांडलेले बरेच मुद्दे पटतात. कायद्यापुढे खरं म्हणजे समान पण काही विशिष्ट लोकांना 'मोअर इक्वल दॅन अदर्स' चे मिळणारे झुकते माप आपल्या पिढीला पटत नाही. ( या विधानामुळे माझा निषेध करू नये कारण या झुकत्या मापामुळे अखेरीस गुणवत्तेशी तडजोडच होते असे माझे स्पष्ट मत आहे. कृपा करून मला जगू द्यावे ही विनंती !)
राजकीय पक्ष आणि भांडवलशाही कंपन्या यांच्यामध्ये फार कमी फरक शिल्लक राहिला आहे असं मला वाटू लागलंय ( उदा. शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाकणच्या (चाकणच्याच ना हो? ) जागेसाठी झालेला करार / वाटप / सौदा) त्यामुळे मत कोणाला द्यायचे हा एक यक्षप्रश्नच आहे.
लालकृष्ण आडवानींबद्दल मला व्यक्तिशः खूप आदर आहे. त्यांची संसदेतील मुत्सद्देगिरी फारच रोचक असते. पण भाजपला एकट्याच्या जिवावर बहुमत मिळणार नाही हे उघड आहे आणि आघाडीचा संसार सांभाळताना वाजपेयींची झाली तशी त्यांचीही कुचंबणाच जास्त होणार हेही उघड आहे. प्राप्त परिस्थितीत देशाला त्यांच्याइतका समर्थ आणि पोलादी नेता मिळणे अवघड आहे. अर्थात आपल्याकडे निवडणुका देशाचा विचार करून न होता स्वतःचा विचार करून होतात त्यामुळे जो कोणी नेता पंतप्रधान होईल त्याने कर्तृत्वाने देशाची मान उंचावता आली नाही तरी निदान लाजेने ती खाली जाणार नाही एवढी तरी दक्षता घ्यावी अशी किमान अपेक्षा आहे. पाहू या ती तरी पूर्ण होतेय का ते...