मागच्या १२ वर्षात आपण दोन्ही [भाजपा व कॉग्रेस] पक्षांची सरकार अनूभवलीत. इतक्यात जगामध्ये बरेच बदल झालेत. जसे की तालीबान ची ताकद वाढतच गेली, अमेरिकेत एक अश्वेत राष्ट्रपती निवडून आला वगैरे. पाकिस्तान कडे आज भारतापेक्षा जास्ती प्रकारच्या मिसाईल्स आहेत... आश्चर्य! आपल्याला त्या बनवायला अजून २०१२ ची वाट पाहावी लागणार आहे. त्यांना त्या अमेरिके कडून व चीन कडून तश्याच मिळतात.
सुदैवाने लोकसभेच्या निवडणुका ह्या मुद्द्यांवर लढल्या जातील असे मला वाटत नाही.

लालक्रुष्ण आडवाणी आता भारताला सावरू शकतात. तुमचे काय मत आहे?

निश्चितच. यापुढेही विरोधी पक्षेनेतेपदी कायम राहून त्यांनी देशाला सावरण्याचे काम असेच चालू ठेवावे, असे मला वाटते.