जर शांतपणे विचार केला तर असं दिसेल की कोणी काय परिधान करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. --नगरीनिरंजन
वरील मताशी पूर्णपणे असहमत. जे सहमत आहेत त्यांनी खालील वाक्यांवर विचार करावा. :-
मला कपडे घालायला आवडत नाही, मी तसाच/तशीच समाजात फिरणार. मी काय घालावे किंवा घालू नये हा माझा प्रश्न आहे, इतरांनी लुडबुड करू नये.
जसले कपडे घातल्या मला सुखकर वाटते तसलेच कपडे मी घालणार. म्हणजे छाटिमा, पोटिमा, ढुंटिमा वगरे प्रकारचे.
मला इंग्रजीचे जसे स्पेलिंग येते, तसेच स्पेलिंग मी करणार. माझ्या लिखाणात कुणी लक्ष घालू नये. ते तसेच वाचावे आणि वाहवा म्हणण्याची रसिकता दाखवावी.
मी सतत शिव्यागाळीची भाषा बोलणार, इतरांनी ती सहन करावी आणि मला धन्यवाद द्यावेत.. .
आंघोळ करणे ही व्यक्तिगत बाब आहे; मी रोज आंघोळ करणार नाही, कुणीही बोलता कामा नये.
नियमाने निश्चित केलेल्या बाजूपेक्षा रस्त्याच्या विरुद्ध बाजूने मी वहाने चालवीन, विरोध करायची कुणाची शामत आहे? भारतात असे करणे म्हणजे अमेरिकनांचे अनुकरण आहे. जर सर्वच बाबतीत करतो आहोत तर या बाबतीत का नको?
क्षणाचा सोबती यांनी लिहिल्याप्रमाणे 'फक्त पाश्चात्त्यांच्या पोषाखाचे नाही तर-- पब, कमी कपडे, लग्नाआधी शरीरसंबंध, विवाहबाह्य संबंध यांचेही अनुकरण करावे, असल्या गोष्टींच्या बाबतीत उगाच नसता ठणठणाट करू नये.. ' छान! चर्चा आता वयात आली आहे.