मलाही हीच समस्या आली होती. येण्याची नोंद करून एखादा लेख उघडल्यास उजवीकडे येण्याची नोंद करण्याचा बॉक्स दिसतो. पण याचे कारण असे असावे-
तुम्ही जो लेख उघडला आहे तो नोंद करण्यापूर्वी (समजा दोन तासांपूर्वी)उघडलेला असेल तर तुमच्या संगणकाच्या कॅश मध्ये साठवलेले दोन तासांपूर्वीचे पानच तुम्हाला दाखविले जाईल(कॅश क्लीअर केलेली नसेल तर). पण तुम्ही हे पान रीफ्रेश केल्यास (F5 दाबून/रीफ्रेश बटन वापरून) हे पान मनोगत सर्वरकडून पुन्हा मागवले जाईल, येण्याची नोंद केलेली दिसेल आणि सर्व नोंदी अद्ययावत दिसतील. [जर एखादा लेख प्रथमच उघडत असाल तर ही समस्या येत नाही असे दिसले]
आधीच्या पानावर माझ्या नावनोंदणीची कुकी असताना, पुढच्या पानावर मी आल्याची नोंद नाही असे पाहून दुसऱ्या एखाद्या माणसाने त्याची येण्याची नोंद करण्याचा प्रयत्न केल्यास मात्र तिथे माझेच नाव दिसते.>>
तुम्ही जाण्याची नोंद करता तेव्हा मनोगत ने साठविलेल्या कुकीज डीलीट होणे अपेक्षीत असते. त्यामुळे दुसऱ्या माणसाच्या नावनोंदणीनंतर तुमचे नाव दिसणार नाही. हे आपोआप होत नसेल तर जाण्याची नोंद केल्यानंतर कुकीज मॅन्युअली डीलीट करणे हेच उत्तम. (फायरफॉक्सध्ये ब्राउजर बंद करताना कुकीज/फाईल्स ई. तात्पुरता डेटा आपोआप आढून टाकण्याची सोय आहे.)