करपलेल्या मनास या कोंब आता फुटणार नाही.
तवप्रीतीचे अमृत ते वाया असे घालवू नको.
दिले होते सर्वस्व कोणा जिणे टाकले ओवाळून
हरलेल्या त्या जुगाराचा डाव पुन्हा लावू नको.
कांचनास पुजिती सारे हृदय पायी तुडवून
शब्दांवर नुसत्याच माझ्या तू अशी भाळू नको.
वरील द्विपदी उत्तम! माहेर पण छान! अभिनंदन!