खरंतर माझ्या कार्यालयात माझ्याकडे आय ई कोणता आहे हेही मला माहीत नाही. एम डी आय इंटरफेस वगैरे मी वापरत असलेल्या आय ई मध्ये असेल तर तेही ठाऊक नाही. मी तो वापरत नाही हे नक्की. पण मलाही कविता विभागात शिरताना अशीच अडचण येते. कविता विभागात नव्याने येण्याची नोंद करावीच लागते. खरंतर हे माझ्या अडचणीचं खूप सौम्य झालेलं स्वरूप आहे. आधी मनोगत कार्यालयातून वापरणं खूप किचकट झालं होतं. मागच्या नोव्हेंबर पासून बऱ्याच अडचणी होत्या. त्या अशा:
१) मनोगतावर येण्याची नोंद न केल्यास कोणतेही नवे लेखन दिसत नाही. सुमारे महिन्याभरापूर्वीचे लेखनच दिसते. पूर्वी असे होत नसे.
२) यासंदर्भात मला असे वाटत आहे की माझे मुखपृष्ठ / स्वगृह स्टॅटिक झाले आहे. त्यावर गेले किमान दोन आठवडे तेच लेखन दिसत आहे. शिवाय कायम कोण कोण आलंय हा दुवा उघडलेला असतो आणि एकच ठराविक यादी दिसते आहे.
३) मुखपृष्ठावर येण्याची नोंद केल्यावर एखादे लेखन वाचण्यासाठी उघडले तर तेथे "प्रतिसाद लिहिण्यासाठी नावनोंदणी किंवा येण्याची नोंद करावी. " असे दिसते. त्या पृष्ठावर पुन्हा येण्याची नोंद करावी लागते. मग मात्र इतर विभागांतही संचार करता येतो.
४) मुखपृष्ठावर येण्याची नोंद केल्यावर नवे (नावनोंदणी करण्यापूर्वी न दिसणारे) लेखन दिसू लागते. त्यातील एखादे उघडले तर प्रथम क्र. ३ मध्ये सांगितल्याप्रमाणे करावे लागते. मग ते लेखन वाचून प्रतिसाद लिहून झाल्यावर जर दुसरे कोणते नवे लेखन वाचायचे असेल तर ते थेट त्या त्या संबंधित विभागात जाऊन वाचता येत नाही. कारण त्या संबंधित विभागात नवे लेखन दिसतच नाही. मग मुखपृष्ठाकडे / स्वगृहाकडे जावेच लागते आणि त्यातही मोठी अडचण आहे.
५) मुखपृष्ठावर येण्याची नोंद केल्यावर नवे (नावनोंदणी करण्यापूर्वी न दिसणारे) लेखन दिसू लागते. त्यातील एखादे उघडले तर प्रथम क्र. ३ आणि ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे अडचणी येतात. मग ते लेखन वाचून प्रतिसाद लिहून झाल्यावर परत स्वगृहाकडे येताना अडचण येते. स्वगृह / मुखपृष्ठ यापैकी कोणत्याही एकावर टिचकी मारल्यानंतर "Page Expired" असे दिसते. "Refresh" केले असता "The page cannot be refreshed without resending the information. Click Retry to resend the information. " अशी माहिती मिळते. त्याप्रमाणे "Retry" वर टिचकी मारली की मुखपृष्ठ / स्वगृह उघडते पण क्र. २ मध्ये वर्णिल्याप्रमाणे. मग तिथे पुन्हा येण्याची नोंद करावी लागते. आणि पुढील नवे लेखन वाचावे लागते.
६) सर्वसाधारणपणे सर्व विभागात उजव्या बाजूला शोध, वाचनखुणा, कोण कोण आलंय वगैरे दुवे दिसत असतात. पण चर्चा विभागात यातील काहीही दिसत नाही. तेथे सर्वात वर एक अगम्य सांकेतिक भाषेतील संदेश दिसतो.
७) जाण्याची नोंद करण्याबाबतही मोठी अडचण आहे. समजा मी एकदा (खरंतर दोनदा) येण्याची नोंद केल्यावर गद्य, कविता, चर्चा अशा तीन विभागांत संचार केलेला असेल (असा संचारही जुने साहित्य वाचतानाच करता येतोय हे वर सांगितले आहेच) तर जाण्याची नोंद प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे करावी लागत आहे. तसे न केल्यास परत मनोगतावर येण्याची नोंद स्वीकारली जात नाहीये. म्हणजे समजा मी गद्य विभागात जाण्याची नोंद करण्यास विसरले आणि मनोगतावरून बाहेर पडले तर कालांतराने परत मनोगत उघडल्यावर येण्याच्या नोंदीच्या जागी देवनागरी अक्षरे काही केल्या लिहिताच येत नाहीत. मग ज्या कुठल्या विभागात पूर्वी जाण्याची नोंद करण्यास विसरले असेन तिथे आधी जाऊन जाण्याची नोंद करावी लागते. मग परत मुखपृष्ठावर येण्याची नोंद करावी लागते. आणि त्यानंतर परत वर वर्णन केलेल्या अडचणींचे दुष्टचक्र सुरू राहते.
(मला वाटायचं की कंपनीच्या फायरवॉलमुळे या अडचणी येत असाव्यात. पण त्यातलं काहीच कळत नसल्याने आणि त्याबाबत फार चौकसपणाही न दाखवल्याने मी आरामात होते. चाललंय ना तसं चालूदे. नाहीतर कार्यालयातून मनोगत वापरण्यावरही बंदी यायची असा विचार करून गप्प बसले होते.)
या सगळ्यांवर प्रशासकांनी न्याहाळकाची कॅश कमी करण्याचा सल्ला दिला होता. तो अजूनही कामी आलेला नाही कारण कॅश कमी करा म्हणजे काय करा हे मला आजही माहित नाही.
पण माझा प्रश्न आपोआपच सुटला. कसा आणि नेमका कधी ते माहित नाही. मी जानेवारीत १५ दिवस रजेवर होते. परत आल्यावर समस्या खूपच कमी होऊन कविता विभागापुरती उरली आहे.
तेव्हा अदिती, १५ दिवस रजेवर जा. प्रश्नाची तीव्रता कमी होण्याची हमी आहे!
हे वाचून वैताग झाला असेल तर क्षमा करा. खराखुरा उपाय मला माहित नाही.