पुन्हा कधी ओळ धुंदशी मी रचेन जाणे
पुन्हा तशी वेदना मला खेटलीच नाही

या ओळी मला वाटतं तुमच्या बऱ्याच गझलांबद्दल काही सांगून जातात. एकूणच एक उदासवाणा, वेदनेचा, सलाचा काटा तुमच्या गझलांतून बोचतो. त्यामुळे धुंद ओळींच्या रचनेसाठी वेदना हा पाया असेल असं वाटतं.

कदाचित मी काहीतरी ऍब्सर्ड बोलत असेन तर क्षमा करा. तुमच्या कवितेतून मला तरी हा वेदनेचा अंतःप्रवाह दिसतो. म्हणून म्हटलं.