१. प्रतिसाद उघडताना 'एरर इन गेटिंग द कॉमेंट' असे येणे.  असे अनेकदा होते.  कधीकधी एकाच लेखातल्या काही प्रतिसादांपुरतीच ही अडचण येते, बाकीचे प्रतिसाद उघडता येतात.

२. नोंद करताना टंकित केलेले नाव वगैरे अतिशय हळूहळू उमटणे.  हे नित्यनियमाने रोजच्या रोज होते.

३. एखाद्या प्रतिसादाचा शेवटचा मजकूर टंकताना जर मध्येच आधीचा मजकूर वाचायला पान खाली सरकवले तर मधल्या काळात मराठी लिपीचा विकल्प बदलून रोमन लिपी उमटायला लागणे.  अशा वेळी कंट्रोल टी वापरून परत मराठी करता येत नाही. बुलेट कळीवर मराठी निवडलेलेच राहिलेले असते. तिथे रोमन करून परत मराठी निवडावे लागते.  ही अडचण दररोज एकदातरी येते.

४. पाठवलेला प्रतिसाद (विचाराधीन नसलातरी) न उमटणे.  हे कधीकधीच होते.

५. आधी वाचलेले लेख प्रतिसादांसकट आठवडाभरात गायब होणे.  कागजकी कश्ती और बारिशका पानी  असल्या काहीशा मथळ्याचा लेख असाच गुप्त झाला.