ही गझल मला सॉनेट (केशवसुतांच्या भाषेत सुनीत) सारखी वाटली. सॉनेटमध्ये शेवटच्या दोन ओळींत विरोधाभास वाटेल अशी कलाटणी कवितेच्या एकूण आशयाला दिली जाते. तसं काहीसं या गझलेत दिसलं मला.

अतिरेकापायी आणि विसंगतीपायी नकोत ती उत्तरे अशी काहीशी भावना पकड घेत असतानाच पाहिजे त्या उत्तरांचा किंवा नकोशी होऊनही सवयीने ज्यांचा हव्यास वाटतो अशीही उत्तरे आहेत, आणि नको ते भस्म झाल्या वर खाली साका म्हणून ती उत्तरे उरली आहेत असं काहीसं एक वेगळंच भान आल्यासारखं वाटलं.

खरंतर नकोश्या उत्तरांच्या वैतागातच खऱ्या / दुसऱ्या उत्तरांचा हव्यास दडलेला आहे. आणि तो इतर आशयाशी पूर्ण सुसंगत आहे. पण व्यक्त करण्याची पद्धत विरोधाभास निर्माण करणारी आहे. रचनेचं हे वैशिष्ट्य खास सुनीताचं म्हणून मानलं जातं. तशी ही गझल झाली आहे.

सुंदर.