माझ्या मते, प्रत्येकाला आपण काहीतरी वेगळे दिसायला हवं असं वाटतं. काहीतरी वेगळं दाखवणे, करणे यात सोप्यात सोप्या पद्धतीचा वापर हा साहजिक असतो. जसं संतोष कागवटेंनी "हे" आदर्श दिसत नाही का असा प्रश्न विचारला, तसा प्रत्येकाच्या मनात येवू शकतो. पण संतोष, तसं बनण्यास वेळही खुप लागतो आणि मेहनतही.

मात्र वेगळी वेशभुषा, केशभुषा, दागिणे वगैरेनी अधिक लौकर आणि कमी मेहनतीत "इतरांपेक्षा वेगळं" दिसू लागतात. त्यामुळे 'फॅशन' ही कपड्यांच्या बाबतीत वेगाने पसरते. त्यामुळे नऊवारीच्या काळात साडी, साडीच्या काळात सलवार सुट, त्यात मग आधी लांब झग्यासारखे, नंतर आखुड कमीझ, आणि सलवार सुटच्या काळात जिन्स-टी शर्ट आले. त्यातही समाधान होत नाही म्हणून जिन्स 'लो-वेस्ट' किंवा 'शॉर्ट टी शर्ट' ची पद्धत मुलींना आवडत आहे. कारण त्यामुळे त्यांच्याकडे इतरांच लक्ष जाते.

ही प्रवृत्ती ' पळा पळा पुढे पळतो कोण' अश्या प्रकारचीच आहे. आपण भलेही परदेशात असं असतं तसं नसतं म्हणतो, पण काहीतरी वेगळं ही प्रवृत्ती सगळीकडेच आहे. अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलिया आणि युरोपिय देशात हे सगळं आधीच होवून गेलय, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचं नवल नाही. आता ते उरले सुरले वस्त्र उतरवण्याच्या तयाऱीत आहे. आता त्यांच्या देशात त्यांचा ध्वज अंतर्वस्त्रासाठी वापरून त्याची जाहिरात केल्या जाते. (बहुदा त्याहीपलीकडे).

पण.... प्रत्येकाला हे आवडत नाही. प्रत्येकच व्यक्ती असं करेल असं नाही. हे परदेशातही म्हणता येइल. परदेशात प्रत्येक मुलगी शॉर्ट कपडेच घालते असं नाही. बऱ्याच मुली जिन्स व शर्ट / टी शर्ट घालतांना मी बघितलय.

भारतात स्वत:ची सामाजिक सुरक्षीतता धोक्यात येणार नाही हे लक्षात आल्यावरच (किंवा दुसऱ्या भाषेत समाज तितका ऍक्सेप्ट करू लागल्यावरच) ती गोष्ट समाजमान्य होते. आणि मग ती मासलेव्हलला (मराठीत काय म्हणायच ? ) पोहचते. भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे अश्या प्रकारच्या अनेक फॅशन आल्या आणि काही काळानंतर गेल्या. (उदा. बॅगी पॅंट, बेलबॉटम, किंवा, स्लीव्हलेसपासून लांब बाह्याचे ब्लाउज पर्यंत). आपल्याकडे मिडी, स्कर्ट, मिनीस्कर्टची फॅशन्सुद्धा येउन गेली (किंवा पुन्हा पुन्हा येत आहे). पण ती अजुनही सर्वमान्य झाली नसल्यामुळे ती मागे पडली आहे. तशीच ही शॉर्ट टी शर्टची फॅशन्सुद्धा येउन जाईल.

आणि समजा ती सर्वमान्य होणार असेल तर तुम्ही आम्ही त्याला काहीही करू शकणार नाही. त्यामुळे माझ्या मते यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नये. मी घालवला तो भाग निराळा.  

थोडक्यात, केवळ इतरांचे लक्ष वेधण्यासाठी हा खटाटोप चालला असतो. यावर एकच उपाय बघून न बघितल्यासारखं करणे. म्हणजे त्या मुली 'या' प्रकारने लक्ष वेधले जात नाही म्हणून बाकी व्यवस्थित कपडे घालतील. यापेक्षा जास्त उतरवणार नाही ही अपेक्षा   

तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, "तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे" (चु. भु.द्या̱. घ्या.)