कविता विभागातील समस्येत काहीही फरक झालेला नाही

सेवादात्याच्या बाजूला असणाऱ्या साचवणीतील पाहुण्यांना दिसणारे हे पान गेल्या तासातच ताजेतवाने झालेले आहे. तेथे तुम्हाला कोणकोणत्या कवितांची यादी दिसत आहे ते कळवावे, म्हणजे ताडून पाहता येईल. शिफ्ट कळ दाबून पान ताजेतवाने केल्यास (शिफ्ट-रिफ्रेश) न्याहाळकाची साचवण विचारात न घेता पान सेवादात्याकडून आणले जाते. (शिवाय वाचकाच्या आंतरजाल सेवादात्याच्या बाजूलाही साचवण असण्याची शक्यता असते असे वाटते.)

आधीचा मजकूर वाचायला पान खाली सरकवले तर मधल्या काळात मराठी लिपीचा विकल्प बदलून रोमन लिपी उमटायला लागणे.

पान वर खाली करताना लक्ष्यकेंद्र पानाच्या सरकवणीवर (स्क्रोल) गेल्याने मूळ मजकुरापासून विचलित होते.

अशा वेळी मजकुराच्या खिडकीत एक टिचकी मारल्यास कळपटाचे लक्ष्यकेंद्र पुन्हा मजकुरावर येऊन लिप्यंतराचे काम पूर्वीप्रमाणे सुरू होईल.