आल्याची नोंद केलेली नसल्यास प्रतिसाद उघडताना 'एरर इन गेटिंग द कॉमेंट' असे येणे असे अनेकदा होते.  पान कितीही वेळा ताजेतवाने केले तरी त्याने फरक पडत नाही. कधीकधी एकाच लेखातल्या काही प्रतिसादांपुरतीच ही अडचण येते, बाकीचे प्रतिसाद उघडता येतात. ही शु. मं. सारखी अडचण मलाही नेहमीच जाणवते.
येण्याची नोंद करताना ती किमान दोन वेळा करावी लागते. एकदा करून होत नाही. दोनदा केल्यावरही पान ताजेतवाने केल्याशिवाय आल्याची नोंद दिसत नाही. मी फाफॉ बंद केले की साठवलेल्या सर्व कुकी आणि कॅश नष्ट करण्याची सोय केलेली आहे, तरी येण्याची नोंद न करता नंतर मनोगत उघडले तर प्रतिसाद वाचायला नेहमी त्रास पडतो. मात्र येण्याची नोंद केल्यावर ह्या अडचणी बरेचदा (नेहमीच नव्हे) आपोआप दूर होतात.