शुम,
हा प्रकार माझ्याही बाबतीत कधीकधी होतो. याबद्दल प्रशासकांची मदत घेतली असता, त्यांनी प्रतिसादाच्या किंवा लेखनाच्या टेक्स्ट एरियामध्ये टिचकी मारून स्वयंसुधारणेचा ऑप्शन मेनू एकदा अनचेक करून परत चेक करावा, असे केल्याने जावास्क्रिप्टचे कार्य परत लेखनाच्या जागेकडे केंद्रित होऊन देवनागरी अक्षरे पूर्ववत मिळायला लागतात असे उत्तर मिळाले.
हा एक रामबाण उपाय असून आजवर जितक्या वेळा ही अडचण आली तितक्या वेळा हा उपाय लागू पडलेला आहे.
'एरर गेटिंग द कॉमेंट ' ची सूचना मलाही बरेचदा मिळते पण पान ताजेतवाने केल्यास पुढील वेळी योग्य प्रतिसाद विनासायास उघडले जातात असा अनुभव आहे.
--अदिती