पंधरा दिवसांची रजा ही गोष्ट खरंच टेंप्टिंग आहे.
साधारणपणे ऋचाने लिहिल्या आहेत तशा अडचणी मलाही कधीकधी येत असतात. सध्या तरी F5 बटणाचा मुक्त हस्ताने वापर करून हे प्रश्न सुटतील असे वाटते आहे. करून पाहते काय होईल ते.
पण फाफॉ वापरण्याची सोय सारखे नाव नोंदवावे लागल्यामुळे जरा कमी झाल्यासारखी वाटते हे खरे. अर्थात हा प्रकार इतरही लोकांच्या बाबतीत होतो आहे म्हणजे माझ्या कचेरीतल्या आणि घरच्याही संगणकाच्या ओ. एस. ला काही झाले नाही हे कळल्यामुळे खूप हायसे वाटले.
सर्वांचे आभार. प्रशासकांचे विशेष आभार.
--अदिती