सन्माननीय ऋचाजी,
गझलेच्या कमीतकमी पाच व्याख्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची व्याख्या आहेः
हरणाचे रूदन - पारध्यापासून जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या हरणाची शिंगे झाडात अडकतात. ती निघत नाहीत. अशात पारधी मागून येतो. हरीण जिवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करते. पण व्यर्थ! शेवटी ते बिचारे रडायला लागते. मृत्यूच्या भीतीने ! हरणाचे ते रूदन म्हणजे 'गझल' अशी पाचपैकी एक व्याख्या आहे. या व्याख्येमुळे गझलेमध्ये 'व्यथा' हा आशयाचा भाग बनण्याचे कारण समजू शकते.
अर्थातच, जाणूनबुजून कुणी व्याख्येप्रमाणे गझल करत नाही. ( इतर चार व्याख्याही मजेशीर आहेत. )
पण, तरीही व्यथा गझलेला खुलवते हे खरे!
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!