"फक्त लालक्रुष्ण आडवाणी आता भारताला सावरू शकतात."

तुमच्या ह्या विधानामागचा आधार काय? हे कळले नाही. आतापर्यंच्या अनेक अनुभवानुसार श्री. अडवाणी एनवेळी कच खाणारे आहेत हेच निष्पन्न झालेले आहे.

राष्ट्रीय पातळीवर पक्षीय बलाबल फक्त भाजपाचेच येणार हा आपला भ्रम तर ह्या विधानामागे नसावा?

त्रिशंकू सरकार येण्याचीच शक्यता आहे असे मला तरी वाटते. उत्तर प्रदेश व बिहार ह्या राज्याचे नेते मंडळी  अशा अस्थिर वातावरणात चांगलीच व पूर्ण जोशात मुसुंडी मारतील असे वाटते. सुश्री. मायावती, लालू प्रसाद यादव, व कुणाचेही सरकार आले तरीही मंत्रीपद पटकावणारे श्री. रामविलास पासवान हे दोन बोके व एक मांजरच पंतप्रधानपदाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणूनच देशाच्या भल्याचा विचार म्हणून (शिवसेनाप्रमुखांच्या ही विचारानुसार ) मुख्यमंत्रीपदाचा धुर्रा यशस्वीपणे हाताळलेले श्री. शरद पवारच देशाच्या पंतप्रधानपदी यावेत अशी माझी तरी ईच्छा आहे. ते फक्त मराठी आहेत म्हणून  नाही तर लांडग्या कोल्हांच्या हाती देशाची सुत्रे जावू नयेत याचसाठी असे म्हणत आहे.

तुमच्या लाडक्या अडवाणींना बेरक्या लालू भर लोकसभेत सगळ्या देशासमोर किती पाणऊतारा करीत बोलतो, तरी ते गप्पच राहतात. जो स्वतःचा मान सांभाळू शकत नाही तो देशाचा मान काय सांभाळणार?