पुढच्या (ड्रूपल ७) ऊर्ध्वश्रेणीकरणाचे वेळी ह्या नव्या न्याहाळकांची योग्य हाताळणी करता येईल अशी आशा आहे. ह्या ऊर्ध्वश्रेणीकरणाचे वेळीही फाफॉ ३ नुकताच आला होता; पण त्याच्याशी जुळवून घ्यायला तुलनेने कमी काम करावे लागल्याने अडचण आली नाही. क्रोमची तपासणीही केलेली आहे आणि नेमके काय अडते ते पाहिलेले आहे. मात्र उपाययोजना इतर बदलांच्या वेळीच करणे कमी त्रासाचे होईल असे वाटते.