F5 ने बऱ्याचशा अडचणी दूर होताहेत.
स्वयंसुधारणा अधूनमधून आपलं तेच खरं करत असते. कधीकधी दीर्घ स्वर आपोआप ऱ्हस्व होताना पाहून विस्मय वाटतो. उदा. दीर्घ शब्द d e e r g h a असा टंकताना दी नंतर चुकून स्पेस पडली तर त्याचा दि होतो. अर्थात हे अगदीच क्वचित होतं. पण स्वयंसुधारणेला धाब्यावर बसवलेलं तिला फारसं पटत नाही हे मात्र अगदी खरं आहे. अशा वेळी शुमंनी सांगितलं आहे तसंच करावं लागतं.
सर्व प्रकारच्या न्याहाळकांवर मनोगत उत्कृष्ठरित्या दिसावं यासाठी प्रशासक जी मेहनत घेत आहेत त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. वेळोवेळी त्यांना पत्र पाठवून विचारलेल्या तांत्रिक अडचणींवरची उत्तरे ते लगेच देतात त्यामुळे इथे वावरणे खूपच सहजसोपे झाले आहे.
--अदिती