काँग्रेस नको हे माझं खुप जुनं मत अजुनही कायम आहे. भलेही भा. ज. पा. ने यापुर्वी त्यांच्या काळात चुका केल्या असतील, पण म्हणून त्यांना पुन्हा संधीच देवू नये ? आणि घोडचुका करणाऱ्या काँग्रेसला, ६० पैकी ५५ वर्ष राज्य करुनही देशासाठी ठोस काहीही न करणाऱ्या पक्षाला पुन्हा निवडून द्यावं ? ज्या पक्षात सर्वाधिक घोटाळे केले, त्याला निवडून द्यायचे ? जिथे गांधींपुढे कुणाचेच चालत नाही, त्या पक्षाला निवडून द्यायचे ?
राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान कोण यापेक्षा पक्ष कोणता हे अधिक महत्त्वाचे असावे असं मला वाटतं. नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये कितीतरी विकासात्मक कामं केलीय, भलेही पैसे खाल्ले असतील, पण काम तर केलं. आणि सातत्याने निवडुनही येत आहे.
शरद पवार कृषीमंत्री असून महाराष्ट्रातीलच आत्महत्या थांबवू शकले नाही तर बाकी गोष्टीच सोडा. राहुल गांधींकडे "गांधी" व्यतिरिक्त काय आहे ? आणि जिला आपली भाषाच कळत नाही ती सोनिया पंतप्रधान ?
कलंत्रीकाका, मला तरी भा. ज. पा. पक्ष म्हणून काँग्रेसपेक्षा १००० पटिंनी बरा वाटतो, तर तुम्ही दिलेल्या पर्यांपैकी मोदी ठीक आहेत.
मात्र पंतप्रधान अडवाणी, हे मनमोहन, सोनिया, राहुल, शरद पवार यांपेक्षा कधीही चांगले.
जाता जाता गंमत :- "कॉन" हे "प्रो" च्या विरुद्ध असेल तर काँग्रेस ही प्रोग्रेसच्या विरोधात आहे