चर्चेचा मथळा व वाचकांचे प्रतिसाद फारच मनोरंजक आहेत. त्यात तथ्य, तथ्यांश, कल्पना, अपेक्षा, गृहितके, अनुमान असे सर्व सर्व आहे. उलट सुलट बोलणे म्हणजे "प्रतिष्ठेचे" असे समजणारे, राहुल-मोदी चालतील वा सोनियांना "ना- हरकत" प्रमाणपत्र देउन मोकळे झालेत. अडवाणींना नाकारताना त्यांच्या कर्तुत्व / अकर्तुत्वाचा वा विचार करण्यापेक्षा त्यांच्या वयाचा अडसर ठरवून मोकळे. म्हणजे यांच्या मते त्यांचे अनुभव सिद्ध ज्ञान हे बाष्कळ बडबड करू पाहणार्‍या क्षुल्लक नेतृत्वगुण मिरवणाऱ्‍या नेत्यांच्या उंचीपेक्षा, खुजे. अशा प्रतिक्रियांवरून यांच्या विचारांची उंची, लांबी, रुंदी अशी अनेक मापे काढता येतात.

निवडणुकात, व्यक्ती / पक्ष / पक्षाची ध्येय, धोरणे, कार्यक्रम /निवडणुकीचे मुद्दे  यापैकी काय जिंकतात? मतदारांनी कशास प्राधान्य द्यावे? याचे साधे सामान्यज्ञान नसणार्‍यांना देखील , आपले एक 'मत' असतेच. बाकी या जंगलात सिंहाला व गाढवाला शिरागणीक एकच मत असते.  त्यामुळेच मग 'मराठी - अमराठी' शिरागणीक एकच मत असल्याचा मराठी माणसाला राग येतो.

वैयक्तीक चारित्र्याचा र्‍हास हे केवळ एकमेव सत्य तथ्य आहे.

मुर्खांना, मुर्खच नेते मिळतात हे एक त्रिवार /त्रिकाळ सत्य भविष्य आहे.

बघुयात आपण किती शहाणे निवडून, पंतप्रधान बनवतो.

बाकी सतिशजी रावले सोडून इतर मराठी बंधु- भगीनींनी मराठी माणसाचा परंपरागत कैवार नाकारण्याचे कार्य चालू ठेवलेच आहे. मग माझ्या सतिशजींनाच मनःपुर्वक शुभेच्छा !!!

पंतप्रधानपदी राजनितीज्ञ हवा की अर्थतज्ञ हवा असाही एक प्रश्‍न आहेच. अर्थतज्ञ,  देशावरचे आक्रमण हा एक आर्थीक अपघात वा घात- पात यादृष्टीकोणातून पाहणार तर मुत्सद्दी राजनितीज्ञ असे आक्रमण हे राष्ट्रवादी अस्मितेवरील युद्धखोर अपराध या दृष्टीकोणातून पाहणार.

बाकी,  नेतेमंडळींची देशभक्ती ही त्यांच्या स्विस बँकेतील "मायेशी" समप्रमाणात वाढते या त्रिकालाबाधीत सत्याशी कोणी असहमत आहे?