मला खरंच काहीच कळलं नव्हतं. आता लक्षात येईल. धन्यवाद. पण एक अजून प्रश्न.

मरणाचे बीज पीकवण्याचे काळाचे कार्य अव्याहत चालू आहे. पण ते नेमके केव्हा पिकणार हे (कुणालाच ) माहीत नाही.

ही कल्पना जरा अधिक विस्ताराने समजावता का? पहिल्यांदा वाचताना मला असं वाटलं होतं की याचा अर्थ काहीसा "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे  l अकस्मात तोही पुढे जात आहे ll" सारखा असेल पण मरणाचे बीज पिकणार कधी या आपल्या प्रश्नानंतर तसा तो आहेसं वाटत नाही. आणि कसा आहे ते कळत नाही. तेव्हा थोडं याविषयी विस्ताराने सांगा.