महिला दिन साजरा केला म्हणून कोणी स्वतःला वेगळं काढून घेतलं असं समजणे बरोबर नाही "मातृ-दिन", " पितृ-दिन " साजरा करतो म्हणजे काय त्यांना समाजापासून वेगळे काढतो का?
स्त्रियांवर अन्याय होत आला आहे हे तर खरच आहे ... आता तुम्ही जी क्रांती वगैरे म्हणत आहात ती फक्त समाजातील उच्च्भ्रू वर्गापुरतीच आहे (अजूनही) , स्त्री शिक्षित झाली, नोकरी करत असली म्हणजे ती स्वतंत्र आहे हे मानणे चुक आहे. अति प्राचीन काली म्हणजे गार्गी, मैत्रेयी इ. नावे तुम्हाला कदाचित परिचित असतील.. त्या काळात यज्ञाचे पौरोहित्य सुद्धा स्त्रिया करित असत. माहित असलेले उदाहरण म्हणजे रामायणातील कैकेयी जी दशरथाबरोबर रणांगणावर गेली होती आणि जेव्हा दशरथ जख्मी झाला तेव्हा त्यचे प्राण तिनेच . वाचवले होते. लता मंगेशकर, मेधा पाटकर या सारख्या कर्तुत्ववान व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत ध्येय गाठतातच परंतु स्त्रियांसाठी ध्येयाचा मार्ग जास्त खडतर असतो ही खरी गोष्ट आहे.
अनिष्ट रीती आणि स्त्रीयांच्या शोषणाबद्दल तुम्ही जे लिहिलीत ते अगदी खरं आहे.. माझाही तोच तर मुद्दा आहे. स्त्री मुक्तीचे मी गोडवे गात नाहीये ... कारण त्या मुळे परिस्थितीत काही बदल होणार नाहीये पण हे सुद्धा तितकच खरं आहे कि नुसतं रडत बसू नका अस सांगणं सुद्धा पुरेसं नाहीये. स्त्रियांनी कसे वागायला पाहिजे, असायला पाहिजे हे अजुनही समाज ठरवतो.. आणि हे ठरवताना स्त्री ही पुरुषाच्या तुलनेने दुय्यम आहे हे अधोरेखित केले जाते ... हे बदलायला पाहिजे.
बाकी नुसते मोर्चे काढून, सभा घेउन, आणि भाषणे देउन स्त्री मुक्ती होणार नाही हे अगदी मान्य ....
तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद !