मी गेल्या १० वर्षात जाणूनबुजून मतदान केलेले नाही. मला याबाबतीत 'निगेटिव्ह' असे संबोधतात. पण मला त्याचे काही वाटत नाही. तो अधिकार आहे म्हणतात. पण त्या अधिकाराची मला जरूरच वाटत नाही. याचे एकमेव अन महत्त्वाचे कारणः
कुठल्याही पक्षाचा कोणताही नेता हल्ली विश्वासार्ह वाटत नाही. मी स्वतः कुटुंबातील विचारधारेप्रमाणे 'भाजप'ला मत द्यायचो. पण अडवानी किंवा वाजपेयीसुद्धा फक्त हवे तेव्हा 'रथयात्रा' वगैरे विषय काढतात. माझ्यामते तिथे राम मंदिर झाले काय अन नाही झाले काय कुणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही. संसदेवर हल्ला झाला तरी नपुंसक राज्यकर्ते थंड होते. भूजच्या भुकंपामध्ये १५० पाकिस्तानी अतिरेकी पळून राजस्थानच्या वाळवंटामार्गे पुन्हा पाकिस्तानात गेले. त्यांना त्या तुरुंगात काय गंमत म्हणुन ठेवले होते काय? युद्धाचे भीषण परिणाम मलाही माहीत आहेत. पण आजच श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर पाकिस्तानात हल्ला झाला. कशासाठी हे भोगत बसायचे? फालतू धर्मनिरपेक्षता अन फालतू हिंदूत्व! नुसते निवडून येण्यापुरते!
ताजवरील हल्ल्यात ( अगदी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली असली तरीही ) एकतरी नेता तिथे आला काय? 'मला माझ्या जीवाची भीती नाही' असे खोटे म्हणायला सुद्धा आला नाही. एरवी अगदी उत्तरप्रदेशातले लोक सुद्धा महाराष्ट्रात आलेले चालत नाहीत. एरवी गोध्ऱ्याला मुसलमान नको होतात. ताजच्या वेळेसे 'ज्याला शेपूट घालणे' म्हणतात तेच केले ना?
वेळ पडली तर इथे देवेगौडासुद्धा पंतप्रधान होतो. आयुष्यभर कॉग्रेसमध्ये राहून ऐनवेळी राष्ट्रवाद आठवतो. 'मते' डोळ्यासमोर आली की काका नको होतात. 'मराठी मराठी' म्हणून शिवाजीपार्कवर सभा गाजवणारे 'राष्ट्रीय पक्ष' होण्यासाठी भगव्यांशी युती करतात. सिंधूदुर्गाला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही की 'ताज'वरील हल्ल्यात 'मला पद न देणारे होते' असे म्हणतात. आई स्वतःच निर्माण केलेल्या कारणांनी दुर्दैवाने निवर्तली तर राजकारणाचा शुन्य अनुभव असणारा तिचा हँडसम मुलगा एकदम पंतप्रधान होतो. त्याच्या दुर्दैवी निधनानंतर इथल्या तथाकथित स्वतंत्र भारतीय नेत्यांना त्याची परदेशी वंशाची पत्नी भारताला तारू शकेल असा साक्षात्कार होतो.
माझ्यामते एकदा ०% मतदान करायला पाहिजे. म्हणजे त्यांचे डोळे उघडतील!