एकदा ०% मतदान करायला पाहिजे. म्हणजे त्यांचे डोळे उघडतील!
श्री. कटककर ह्यांनी जे विचार मांडले ते मला खरचं खूप भावले. सगळ्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान करायला जायचेच नाही. पण मग... जायचे कुठे? कुठेतरी दूर डोंगरमाथ्यावर, नदीकिनारी शांत ठीकाणी जायचे. चित्रे काढायची, कविता करायच्या. गाणी गुणगुणायची. खरचं किती रोमँटीक कल्पना आहे, नाही कां? खूप छान! आपण आपल्या भावी सुखासाठी सदिच्छांच्यारुपात मतदाना च्या माध्यमातून आपलं आपल्यापुरतं कर्तव्य करायची गरजच काय? आपल्या मनाला येईल तसं वागायचं व त्याच सोबत आजुबाजूला जे काही वाईट घटते त्यासाठी ईतरांनामात्र दोषी ठरवायचे. आपण कविता रचत, पठण करीत असताना दुसऱ्या कोणी मंडळींनी त्यांना आवडेल असे वागले, नाचू लागले तर मात्र महात्मा गांधी चे नाव घेवून देश कसा काय बिघडला? असे इतरांना विचारायचे, त्यांना दंडीत कसे करता येईल याचा पाठपुरावा करायचा.
(काही भाग संपादित)