श्री. गणेशरावांनी सावरकरांची मूळ हिंदुत्वाची नेमकी व्याख्या दिली आहे. या व्याख्ये प्रमाणे वैदिक धर्म मानणारे, न मानणारे, शीख, जैन, बौद्ध, शिव, वैष्णव, आर्यसमाजी.... हिंदूंच्या सर्व जाती-जमाती समाविष्ट होतात. राज्य घटनेने हिंदू व्यक्तिगत कायदा लागू करताना हाच विचार मान्य केला आहे. ही व्याख्या राजकिय आहे. सावरकर म्हणत असत- हिंदू जातीचे हित साध्य होईल असे पहायला हवे. तो हिंदू कोणत्या प्रकारचे धार्मिक कर्मकांड करतो, तो नास्तिक आहे की आस्तिक याच्याशी काहीच कर्तव्य नाही.