कै.नारायण वामन टिळकांच्या कवितेतील काही ओळी पाहाण्यात आल्या, त्या येथे उधृत करतो-
'माझी भार्या' या कवितेतेत ते म्हणतात-
नमितो मातेला- जगत गणिते दैवत तिला;
नमितो कांतेला -नृपपद उणे जीस तिजला;
नमितो मैत्रीला- परगृहिताही भगिनीला;
नमितो कन्येला- सतनू ममता तीच विमला!
मला कोणी कोणी उगिच स्त्रैण म्हणती
न जाणोनी, की स्त्री-पुरुष दोन नसती;
अहा! अंगे जीची, अनुपम अशी शक्ती विलसे!
पसारा तीचा हा ! तिजविण कुठे काहिच नसे!
--------
परगृहिताही भगिनीला- लग्न होऊन परक्याच्या घरी गेलेल्या माझ्या बहिणीस
स्त्रैण - सदैव बायकांमध्ये वावणारा