इतक्या सविस्तर आणि मुद्देसुद प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !

यापण निखिलच्या कोणत्या म्हणण्याला हे उत्तर आहे? का हा स्वतंत्र मुद्दा आहे? 

तुम्ही नीट वाचलेले दिसत नाही .. 

  न मांडलेले मुद्दे खोडून काढण्यात का वेळ का घालवता?

परत तेच -- नीट वाचून सल्ला द्या ....

अर्धवट कथा लक्षात ठेवून भ्रमात राहू नका एवढाच सांगायचा मुद्दा आहे

भ्रम नाही हो हा... तुम्ही नीट आभ्यास केला आहे का भारतीय प्राचीन संस्कृतीचा तुम्हाला स्त्रिया प्रगत आणि प्रभावशाली असण्याचे पुरावे सापडतील ...

सोदाहरण / सप्रमाण सिद्ध करा.

आता हे कसं  करणार...  माझे केवळ पुस्तकी आणि ऐकीव ज्ञान  आहे.

मुद्दा एवढाच की पूर्वी इथे कसं छान छान होतं आणि आता सगळं बिघडलंय असा दृष्टिकोण बाळगू नका.

नाही माझा हा दृष्टीकोण अजिबात नाही ... आता सगळं बिघडलय असं मला वाटत नाही फक्त ज्या विसंगती दिसतात/ अनुभवाला येतात त्याच मी लिहायचा प्रयत्न केला ...

तुम्ही आजच्या बदललेल्या परिस्थिती बद्दल लिहिलं आहे हे मान्य आहे... त्यात काही दुमत नाहीच आहे. पण माझा मुद्दा आहे कि फक्त भौतीक प्रगतीमध्येच समाधान मानायचं का?  अजुनही घरातले/ घरासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय पुरुष घेतो... पत्नी कितीही उच्चशिक्षित असली तरी आर्थिक व्यवहार, गुंतवणुक यात तीला फारसं महत्त्व दिलं जात नाही. नोकरी करणाऱ्या सुनेकडून अजुनही सासरचे लोक किंवा समाजातले लोक गृहकृत्यदक्ष/आज्ञाधारक इ. असण्याची अपेक्षा करतात... त्यात काही कमी जास्त झाले तर तिला जिवघेणी बोलणी सहन करावी लागतात. आणि अनेक स्त्रिया हे यशस्विरितीने करतात देखील त्या साठी काही वेळा त्यांच्या वैयक्तिक इच्छा/ आकांक्षा, मान/अपमान या कडे दुर्लक्ष केले जाते ..  पण काहीजणींना हे इतकं सहज पणे जमत नाही.. तिथे संघर्ष होतो ..  हे मात्र ऐकीव नाही  हे पाहिलेलं / अनुभवलेलं आहे . मग अशा वेळी तुम्ही काय म्हणाल? स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण निकोप आहे?

माझा मुद्दा इतकाच आहे कि भौतिक प्रगती बरोबरच समाजाची आणि स्त्रियांची मानसिकताही बदलायला हवी.

एक इंदिरा, एक प्रतिभा, एक सानिया, एक सोनिया, एक माधुरी, एक मेधा यांची उदाहरणं विसरा ..

का विसरायची ही उदाहरणं... हा तर प्रेरणास्त्रोत आहे ना . तुम्ही जी उदाहरणं दिली आहेत ती स्त्रियांची क्षमता सिद्ध करतात.. आणि स्त्री ही सक्षम आहे हे तर मान्य आहेच. किंबहूना तुम्ही जर लेख नीट वाचलात तर -- लक्षात येइल तोच तर आधारभूत मुद्दा आहे. स्त्री ही पुरुषाइतकीच सक्षम असूनही तीला दुय्यम स्थान दिले जाते हेच मला म्हणायचे आहे.