मनिषा २४ म्हणतात-
"अजुनही घरातले/ घरासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय पुरुष घेतो... पत्नी कितीही उच्चशिक्षित असली तरी आर्थिक व्यवहार, गुंतवणुक यात तीला फारसं महत्त्व दिलं जात नाही. नोकरी करणाऱ्या सुनेकडून अजुनही सासरचे लोक किंवा समाजातले लोक गृहकृत्यदक्ष/आज्ञाधारक इ. असण्याची अपेक्षा करतात... त्यात काही कमी जास्त झाले तर तिला जिवघेणी बोलणी सहन करावी लागतात. "
हे तितकेसे खरे नाही. बहुसंख्य घरातून, अगदी अशिक्षितांच्या सुद्धा, आर्थिक निर्णय घेताना स्त्रियांना अजिबात विचारले जात नाही, हे खरे नव्हे! स्त्री ही मोलाचा सल्ला देणारी आहे, हे सुभाषितकारांनी ही म्हटले आहेच. आम्ही घरा-घरातून हे प्रत्यक्ष अनुभवत असतो. अर्थात प्रत्येक वेळी सल्ला मानला जाईलच असे नव्हे! 'आपला सल्ला मानला जात नाही, आमच्या घरी स्त्री राज्य आहे, वगैरे' या भावना अनेकदा पुरुषांत देखील जाणवतात.. हे घडायचेच! व्यक्ति-व्यक्ती भिन्नता राहायचीच!
गृहहितदक्ष/ अज्ञाधारक आदी गुण पुरुषांजवळ देखील असलेच पाहिजेत ना? ! मनिषाबाईंची इच्छा दिसते की नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडून अशा अपेक्षा ठेऊ नयेत. हे फारच झाले!
पुरुष असो की स्त्री, सर्व गुणसंपन्न असावेत ही अपेक्षा ठीक! पण अपुर्णता रहणार हे गृहित धरले तर जीवन अधिक सुखद होईल.
(व्यक्तिगत संदर्भ वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)