ऋचा,
अतिशय संतुलित प्रतिक्रिया आवडली.
मला वाटतं , आपल्यापेक्षा शारिरीक / मानसिक / भावनिक दृष्ट्या दुबळ्या व्यक्तिवर अधिकार गाजवण्याची वृत्ती सगळ्या मानवजातीनेच प्रयत्नपूर्वक सोडली पाहिजे. तू म्हणतेस ती उत्क्रांती होण्यासाठी ही माझ्या मते सर्वात महत्त्वाची पायरी असावी. प्राप्त परित्थितीत तारतम्य आणि सुसंस्कृतपणा या दोन गोष्टीच सर्व मानवजातीला उपयोगी पडणार आहेत. माझ्या मते आठ मार्चचं स्तोम न माजवता , 'अधिक विचारी मानव' ही आपली (म्ह. मानवाजीची) जीवशास्त्रीय व्याख्या सार्थ ठरेल असं वागणं, मानवधर्मानं वागणं हे आपल्या पिढीचं , आपल्या समाजाचं यापुढील काळातलं ध्येय असावं.
मैत्रेयीची गोष्ट इथे दिल्याबद्दल धन्यवाद. गार्गीनेही वादविवाद स्पर्धेत एका ऋषींचा पराभव केला होता असं ऐकलंय. त्याबद्दलची कथा माहीत असल्यास मला व्य नि ने पाठवू शकशील का?
--अदिती