तुमचं म्हणणं मला फारसं कळलं नाही कारण मला गझल म्हणजे काय, ती कशी असते किंवा असावी, गझल आणि कविता यांत फरक काय हे काहीच नीट माहित नाही. स्पष्ट कराल का?
माझ्याकडून यापूर्वी कधीच गझलेची रचना घडलेली नाही. खरंतर गेले काही महिने सातत्याने मनोगतावरच गझला वाचल्यामुळे तो प्रभाव पडून ही रचना घडलेली आहे अशी माझी खात्री आहे.
माझी ही रचना सर्वमान्य संकेतांनुसार गझल नसेल तर ती आहे असा दुराग्रह मी कधीच धरणार नाही. पण आपल्या प्रतिक्रियेने माझी जिज्ञासा जागृत झाली आहे. अवश्य कळवा. गझलेविषयी अधिक जाणून घ्यायला निश्चित आवडेल.
प्रतिसादांबद्दल सर्वांनाच मनःपूर्वक धन्यवाद.