अर्धवट कथा लक्षात ठेवून भ्रमात राहू नका एवढाच सांगायचा मुद्दा आहे
भ्रम नाही हो हा... तुम्ही नीट आभ्यास केला आहे का भारतीय प्राचीन संस्कृतीचा तुम्हाला स्त्रिया प्रगत आणि प्रभावशाली असण्याचे पुरावे सापडतील...
माझा अजिबात अभ्यास नाही. तुमचा असेल तर तर पुरावे इथे सादर करा. निदान त्याचा स्पष्ट संदर्भ द्या म्हणजे वाचून, पाहून माहित करून घेता येईल.
सोदाहरण / सप्रमाण सिद्ध करा.
आता हे कसं करणार... माझे केवळ पुस्तकी आणि ऐकीव ज्ञान आहे.
त्या पुस्तकातली / ऐकीव उदाहरणं संदर्भासह सादर करा. पूर्वीच्या घटनांबाबत तज्ज्ञ संशोधकांचे मत प्रमाण मानायला माझी पूर्ण तयारी आहे.
एक इंदिरा, एक प्रतिभा, एक सानिया, एक सोनिया, एक माधुरी, एक मेधा यांची उदाहरणं विसरा..
का विसरायची ही उदाहरणं... हा तर प्रेरणास्त्रोत आहे ना.
वाक्य अर्धवट उद्धृत करून स्वतःची आणि इतर वाचकांची दिशाभूल करत आहात. मूळ परिच्छेद मुद्दाम परत देते.
एक इंदिरा, एक प्रतिभा, एक सानिया, एक सोनिया, एक माधुरी, एक मेधा यांची उदाहरणं विसरा एकवेळ पण सभोवार दिसणाऱ्या अनेक मुली शाळाकॉलेजांत का होईना, पण वेगवेगळे खेळ खेळताना, नाटका सिनेमांत छोटीमोठी कामं करताना, छोट्या मोठ्या सेवासंस्थांतून कामं करताना, वेगवेगळ्या कलांचं शिक्षण घेऊन समाजाभिमुख सादरीकरण करताना, लाटणी मोर्चे काढताना दिसतातच ना? हा बदल चांगला आहे का नाही?
सांगण्याची गोष्ट ही की महान माणसं ही स्त्री असोत वा पुरुष ती महान असतात आणि कायमच अपवादात्मक असतात. त्यांच्यापासून प्रेरणा मिळते हे निर्विवाद सत्य आहे. पण म्हणून प्रत्येक स्त्री ही देशाची राष्ट्रपती, पंतप्रधान, जगन्मान्य कलाकार किंवा खेळाडू होणार नसते. (तसाच प्रत्येक पुरुषही महान नसतो.)
एक सामान्य माणूस म्हणून एका मर्यादित चौकटीतच बहुसंख्य माणसांना जगायचे असते. म्हणून त्या चौकटीत स्त्री अधिक स्वयंपूर्ण स्वतंत्र कशी होईल याचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. म्हणून महान स्त्रियांची उदाहरणे एकवेळ बाजूला ठेवून सामान्य आयुष्यात कर्तृत्व दाखवणाऱ्या, बदल घडवणाऱ्या, स्वतःला बदलणाऱ्या स्त्रियांची उदाहरणं मी चर्चेला घेतली.
याचा अर्थ असा नव्हे की हे प्रेरणास्रोत कोणी मान्यच करू नयेत किंवा मला ते मान्य नाहीत.
पुन्हा वाचलं. माझी समजूत बदलली नाही. त्याअर्थी नीट वाचलं नसावं. जाउदे, माझी कुवत कमी आहे. तुम्ही समजावा.यापण निखिलच्या कोणत्या म्हणण्याला हे उत्तर आहे? का हा स्वतंत्र मुद्दा आहे?
तुम्ही नीट वाचलेले दिसत नाही..
न मांडलेले मुद्दे खोडून काढण्यात का वेळ का घालवता?
परत तेच -- नीट वाचून सल्ला द्या....
अजुनही घरातले/ घरासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय पुरुष घेतो... पत्नी कितीही उच्चशिक्षित असली तरी आर्थिक व्यवहार, गुंतवणुक यात तीला फारसं महत्त्व दिलं जात नाही. नोकरी करणाऱ्या सुनेकडून अजुनही सासरचे लोक किंवा समाजातले लोक गृहकृत्यदक्ष/आज्ञाधारक इ. असण्याची अपेक्षा करतात... त्यात काही कमी जास्त झाले तर तिला जिवघेणी बोलणी सहन करावी लागतात. आणि अनेक स्त्रिया हे यशस्विरितीने करतात देखील त्या साठी काही वेळा त्यांच्या वैयक्तिक इच्छा/ आकांक्षा, मान/अपमान या कडे दुर्लक्ष केले जाते .. पण काहीजणींना हे इतकं सहज पणे जमत नाही.. तिथे संघर्ष होतो.. हे मात्र ऐकीव नाही हे पाहिलेलं / अनुभवलेलं आहे. मग अशा वेळी तुम्ही काय म्हणाल? स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण निकोप आहे?
थोडा उगाचच मूलगामी (Radical) वाटेल कदाचित हा मुद्दा. पण मला जेन्युइनली पडलेला प्रश्न आहे. या वरच्या परिच्छेदात तुम्ही व्यक्त केलेल्या सगळ्या अपेक्षा पुन्हा एकदा तेच ते चूल आणि मूल या कक्षेतल्या नाहीत का हो? त्यापेक्षा बाहेरचा विचार ज्यांना करणं शक्य आहे त्यांनी परत परत त्याच वर्तुळात फिरत का राहावं? जे नाही कुणाला आवडत / पटत ते नाही पटत! घरातल्यांनी आपल्याला मान दिला पाहिजे हे बरोबर पण नसतील देत म्हणून इतर कुणीच देत नाही असं नाही ना? त्यानं मनस्ताप होतो पण त्याच्याबाहेर आयुष्यच नसल्यासारखं त्यावरच स्त्रीच्या स्वातंत्र्याची सगळी भिस्त असल्यासारखं त्याच त्या अपेक्षांत आपण तरी का अडकायचं?
याबाबत बदल घडणे गरजेचे आहे याबाबत दुमत नाही. दृष्टिकोण बदलला पाहिजे, निकोप झाला पाहिजे वगैरे अपेक्षा म्हणून रास्त आहेत. पण त्यावर काथ्याकूट किती करायचा? आपल्याला जे करणं शक्य आहे ते करणं महत्त्वाचं आहे. लोकांची मतं कृतीतून बदलतात. शिकवून नव्हे. हे लक्षात ठेवलं पाहिजे.
एकच उदाहरण देते. पूर्वी डॉक्टर स्त्री म्हणजे स्त्रीरोग आणि प्रसूतितज्ज्ञ हे जवळजवळ समीकरण होतं. पण आज पुरुष रुग्णही पूर्ण विश्वासाने विविध विशेषज्ञ स्त्रियांकडून उपचार करून घेतात. स्त्रीची ही क्षमता जी पूर्वी कधी सिद्ध झालेली नव्हती, ती सिद्ध केल्यावर दृष्टिकोण आपोआपच बदलला.
आणि स्त्रीच्या अशा अनेक क्षमता आहेत की ज्या पूर्वी ती स्वतःच ओळखत नव्हती किंवा तिला कधी सिद्धच करता आल्या नाहीत. प्रतिक्रियांची पर्वा करून इतरांच्या दृष्टिकोणाची पर्वा करून त्या कधीच सिद्ध करता येणार नाहीत. विरोधावर मात करूनच ते करावं लागेल याला पर्याय नाही. अहो फुल्यांसारख्या व्यक्तीला आपल्याच दारावरून आपलीच अंत्ययात्रा चाललेली पाहण्याची वेळ आली. रस्त्यात दगडफेक, चिखलफेक सहन करावी लागली. आपल्याला घरगुती टोमण्यांचा आणि प्रतीकाराचा सामना करता येऊ नये? तो येत नसेल तर स्वातंत्र्य तरी कशाच्या बळावर हवं आपल्याला?