सन्माननीय ऋचाजी,
गझलेचा कुठलाही शेर हा दुसऱ्या शेरावर आशयासाठी अवलंबून नसतो.
१) खुळा जीव झाला, कशाने कळेना
तुझी दूरताही अताशा छळेना
२) जिथे तू तिथे मी, मना नित्य वाटे
इथे तू तिथे मी, मला हे कळेना
आपल्या या वरील ओळींपैकी दुसरा शेर हा किंचित मतल्यावर अवलंबून वाटतो. पण तोही पूर्णपणे अवलंबून म्हणता येणार नाही.
तसेच :
इथे तू तिथे मी मला हे कळेना : ऐवजी इथे की तिथे मी मला हे कळेना हे स्पष्ट व्हावे.
माझ्यामते आपली ही रचना 'कविता' नसून 'गझल'च आहे.