खुळा जीव झाला, कशाने कळेना
तुझी दूरताही अताशा छळेना
वा. ह्या ओळी आवडल्या. तुझी दूरताही अताशा छळेना ही ओळ फारच आवडली.
जिथे तू तिथे मी, मना नित्य वाटे
इथे तू तिथे मी, मला हे कळेना
वा. फार छान भूलभुल्लैय्या आहे.
माझ्यामते काही द्विपदी अधिक स्पष्ट असायला हव्या होत्या. त्याबद्दल आधीच चर्चा झाली आहे. तसेच 'सावली' ऐवजी 'चेहरा' हा शब्द असता तर कसे?
ह्या रचनेतल्या प्रत्येक द्विपदीचा स्वतंत्रपणे, द्विपदी मूळ रचनेपासून वेगळी काढून, आस्वाद घेता येत असेल तर ही रचना गझलच आहे असे म्हणायला हवे. एकंदर तुमचा पहिला प्रयत्न अतिशय आश्वासक आहे. मनापासून शुभेच्छा!