योग वासिष्ठ या ग्रंथात हे जग म्हणजे दृढ संकल्पाचा परिपाक आहे असे स्पष्ट सांगितले आहे.

म्हणून, जर कोणी खडा घालून यशस्वी होत असेल तर तो परिणाम खड्याचा असण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या संकल्पाचा असतो. "हा खडा धारण केल्याने मी यशस्वी होइन हा संकल्पच यश देतो."

आयुर्वेदिक दृष्टीने प्रत्येक खड्याचा विशिष्ट गुणधर्म असतो आणि त्यानुसार त्याची रोगावर वा व्यक्तीची प्रकृती पाहून योजना करता येते.

शास्त्र हे विश्वास ठेवण्यासाठीच असते. कारण पुढच्यास ठेच लागल्यावर, इतर शहाणे होण्यासाठी, समाजरचना घडण्यासाठी  शास्त्र बनते.

म्हणून ठेवाल तर विश्वास. नाही तर ज्याने हे जग निर्माण केले त्याला काहीही फरक पडत नसतो.

फरक आपल्याला पडतो.