चित्त,
प्रोत्साहनाबद्दल धन्यावाद. तुमच्याकडून ही प्रतिक्रिया आली हेच खूप आहे.
गझलेविषयी एक वाङ्मयप्रकार म्हणून अधिक माहिती तुम्ही निश्चित देऊ शकाल. द्याल का?
चेहरा हा शब्द तुम्हाला काही निश्चित अर्थ देऊ शकत असेल तर तुम्ही तसं अवश्य म्हणा.
पण तिथे माझ्या मनात सावलीच होती. मला सुचताना तो चेहरा म्हणून सुचलाच नाही. कदाचित प्रेमिकांच्या संदर्भातली "साया" ही कल्पना डोक्यात असेल. माहित नाही. पण कवी म्हणून विचार करताना असं वाटतं की इथे जसं उतरलं ते तसंच आहे म्हणून उतरलं.
चेहरा असता तर जे मी म्हटलंय ते मी म्हटलं नसतं. एवढंच.
समीर,
तुम्हाला वाटलं, तुम्ही लिहिलं. मला पूर्ण आदर आहे. तुमच्या दुसऱ्या प्रतिसादात एकदम सावध पवित्रा घेतलात म्हणून सांगते - खरंच त्याने माझ्या रचनेत कमीपणा येतो असं वाटून नाही मी विचारलेलं. किंवा तुम्ही ही गझल नाही असं म्हणताय/ तसा आरोप माझ्यावर करताय वगैरे मला नाही वाटलं. प्रामाणिकपणे जिज्ञासू प्रश्न होता. गझलरचना मी केलेली नाही हे तर मी म्हटलंच आहे. आणि खरंच त्यातलं मला काहीच माहित नाही. केवळ सातत्याने त्याप्रकारचं वाचन झाल्यानं तो प्रभाव माझ्या लेखनावर पडला आहे. मी नवशिकीच आहे म्हणून सल्ला विचारला.
भूषण,
शेरांचं परस्परावलंबित नसणं हा गझलेचा गुणधर्म सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणखी माहिती मिळेल का?