"आय ई किंवा फायरफॉक्स सारख्या ब्राउझर्समध्ये, जेंव्हा एमडीआय इंटरफेस असते तेंव्हा, म्हणजे इंटरनेट एक्सप्लोअरर ७. ० आणि त्यावरील व्हर्जन्समध्ये जिथे एकाच मुख्य खिडकीत अनेक पाने ब्राउझ करता येतात, तिथे मनोगतावर वावरताना मला एक विवक्षित अडचण जाणवते आहे..... "

मोझिला... क्रोम....फायरबॉल.... वगैरे गोष्टी मी संगणक क्षेत्रातला माणूस नसल्यामुळे काहीच कळल्या नाहीत.

मला आलेली अडचण निराळीच! मारुती स्तोत्राचा कुणाला तरी अर्थ हवा होता. मी तो तिनदा लिहला. प्रत्येक वेळी 'पाठवा' या टप्प्यापर्यंत अल्यानंतर सारेच लेखन गायब होई. असे तिनदा झाल्यानंतर मला त्या लेखनाचा नाद सोडावा लागला. असे का घडले, त्यावर उपाय काय? कोणी सांगितल्यास हवे आहे.

तसेच मला पाय मोडका 'न' लिहता येत नाही. त्या बाबत देखील मदत हवी आहे.