चेहरा हा शब्द तुम्हाला काही निश्चित अर्थ देऊ शकत असेल तर तुम्ही तसं अवश्य म्हणा.
पण तिथे माझ्या मनात सावलीच होती. मला सुचताना तो चेहरा म्हणून सुचलाच नाही. कदाचित प्रेमिकांच्या संदर्भातली "साया" ही कल्पना डोक्यात असेल. माहित नाही. पण कवी म्हणून विचार करताना असं वाटतं की इथे जसं उतरलं ते तसंच आहे म्हणून उतरलं.
चेहरा असता तर जे मी म्हटलंय ते मी म्हटलं नसतं. एवढंच.

मला सावलीचा अर्थ फारसा लागला नाही. म्हणून आपला चेहरा सुचवला. तसाही चेहरा म्हटले की साहजिकपणे आरसा येणारच.  म्हणून तो नकोच. 

शेवटी कविता ही कवीचे/ कवयित्रीचे अपत्य आहे, हे तुमचे म्हणणे मला पूर्णपणे मान्य आहे. आणि ह्या अपत्याचे डोळे, नाक, चेहऱ्याची ठेवण कशी असावी हे सर्वस्वी त्या त्या कवीवर/कवयित्रीवर अवंलबून असते, असावे. असो. आपली गंमत.

पुलस्तींनी दुवे दिले आहेतच. शिवाय --
ह्या दुव्याला भेट द्या. प्रत्येक द्विपदीचा जो कीस पाडला आहे तो वाचनीय आहे.