आपले विचार फार पटले. मुलं आवडत नसल्यास जन्म न देणे उत्तम पण जन्म दिलाच तर मात्र सर्वस्व ओतून वाढवली पाहिजेत. मूल ही एक वस्तू नसून भविष्यकाळाची वर्तमानाकडे असलेली ठेव असते. ती घडण्यात वा बिघडण्याता आईचा फार मोठा हात असतो. पण दुर्दैवाने एवढा विचार करणारे फार लोक नसतात. एका महत्त्वाच्या विषयावर योग्य आणि प्रभावी भाष्य केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.