सहमतः एकाच कुटूंबात दोन्ही प्रकारची अपत्ये अढळतात. एक- सगळ्यांसारखे धोपट मार्गाने जाणारी व दोन- इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने जाणारी, हे त्रिकालाबाधीत आहे. दिग्दर्शकांचा म्हणजे पालकांचा "कस" तिथेच लागतो की कोणत्याही मार्गाने जाणारी अपत्ये ही सकारात्मकता, सभ्यता बाळगुनच ध्येयाप्रत पोहोंचत आहेत हे समाजास आश्वासीत करणे [क्वॉलीटी ऍशुअरन्स ऑफ सन्स अँड डॉटर्स ], अन्यथा त्यांच्या दुष्कृत्यांचे उत्तर्दायित्व तसेच अशा अपत्यांमुळे समाजाचे नुकसान [मूर्त वा अमूर्त / टँजीबल वा इंटँजीबल] होत असेल तर ती भरपाई [पुरेपूर] करण्याची अंतीम जबाबदारी ही दिग्दर्शकांचीच.
पियर-प्रेशर मध्ये येवून व्यसनाधिनतेकडे, असभ्यतेकडे, झुकण्यापेक्षा इथे असा दबाव झुगारून "ऑड मॅन आऊट--इतरांपेक्षा वेगळे" ठरण्यास मुळीच कचरूनये असे किती पालक आपल्या पाल्यांना सध्या शिकवतात हा वादाचा मुद्दा आहे. तसेच योग्य पियर --समवयस्क कसे निवडावेत हे देखील प्रशिक्षण पाल्यांना दिलेच पाहिजे.
मथितार्थः पाल्यांना नेहमीच धोपट मार्गाने वा नेहमीच वेगळ्या मार्गाने जाणे न शिकवता, सदसदविवेकबुद्धिने कधी धोपट तर कधी वेगळ्या मार्गाने जाणे शिकवणे व एकूण आपला पाल्य स्वतः जगताना समाज गढूळ करणारच नाही हे समाजास "आश्वासित" करणे हे पालकांचे कर्तव्य.
तसेच यांच्या समोर रोलमॉडेल [व्यक्ती आदर्ष ] निवडताना /ठेवताना मंदिरा की मोनिका की किरण? असे पर्याय ठेवून नंतर त्यांचे आयुष्याची परिणती काय? व कशी? अशी साद्यंत माहीती ठेवावी.
आपल्याकडे एक फार गमतीशीर प्रकार आढळतो, तो म्हणजे एकाच व्याधीसाठी ३-४ डॉक्टरांकडे जायचे व आपल्या सोयी प्रमाणे व आवडी प्रमाणे एकाचे 'औषध' व दुसऱ्याचे 'पथ्य' निवडायचे.
सुविचारांचा देखील असाच वापर सिलेक्टिव्ह ---आपल्या सोयीप्रमाणे करायचा. अधोलिखीत तुकाराम महाराजांच्या ओविचा गैरार्थाने वापर जास्त अढळतो. जोपर्यंत स्वतःला चटके बसत नाहीत, तो पर्यंत " जे जे होईल ते ते पाहावे" नंतर चटके जाणवू लागले की " आले अंगावर घेतले शिंगावर" असे औषध घ्यायचे, असो.
तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, "तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे" (चु. भु. द्या̱. घ्या. )